anubhav
नुमान-एक कविता 5/23/2006 6:06 PM
आक्रित विक्रित वैगरे
काय काय घडायला लागलय....
पोरगं येता जाता
चक्क पाया पडायला लागलय....
का तर म्हणे डॅडी सध्या मी,
सुपरमन नाही हनुमान आहे.....
मी म्हटल हो का?
छान आहे!!
बायको म्हणाली सोन्यासारख पोर माझं
करतयं संस्कृतीच रक्षण
चेष्टा सुचतिय तुम्हाला
जळ्ळ मेलं लक्षणं......
अंजनीच्या पाठिम्ब्याने पवनपुत्र हसु लागला
घरातला झिरोचा बल्ब ही त्याला
सुर्याचा गोला दिसु लागला....
रोज नवे पराक्रम.....
रोज नवे उड्डाण....
बिल्डिंग हवालदिल
सोसायटी हैराण
संध्याकाली घरी येताना
रोज चिंता लागलेली,
कोण जाने आज
कोणत्या लंकेला आग लागलेली.....
शेवटी शेपुट सरसावुन म्हणलो
'प्रिये, हे अवघड होत चाललय विलक्षण
हे केवल टि. व्हि. च खुळ आहे,
नाही संस्कृतीचं रक्षण'
म्हणाली उतरतय जरासं खुल
तो आता जरा ऍट ईझ होतोयं.....
पण मला बाई वेगळीचं चिंता लागलेली,
उद्या लॉर्ड कृष्णा रिलिज होतोय.....
==================================
गुन्हा 4/8/2006 12:37 AM
आता असं करू या
अनोळखी होऊ या पुन्हा
अन बघू या , घडतोय का
पुन्हा तोच गुन्हा
वाटेल का तुला तेच
नव्याने माझ्याबध्दल ?
की आता नक्की झाला आहे
तुझ्यामध्ये बदल ?
खरंच का आवडणार नाही
माझं तुझ्यामागे लागणं?
खरंच तू म्हणणार नाहीस
"ईश्श्य ! काय रे तुझं वागणं !"
काय हरकत आहे ,
दोन चार पावसाळे मागे जायला?
अन पुन्हा एकदा तसंच
मनसोक्त भिजायला?
हे मिळमिळीत जगणं...
करूया का चटकदार?
चल होऊन जाऊ पुन्हा
एकाच गुन्ह्याचे भागीदार !
============================
तु आणि मी 4/8/2006 12:32 AM
तुला लागतो चहा , मला लागते कॉफ़ी
तुला नाही आवडत मी उलटी घातलेली टोपी
तुला वाटते थंडी , मला होतं गरम
तू आहेस लाजाळू , मी अगदीच बेशरम
तुझं आणि माझं जमणार तरी कसं? ॥ १ ॥
झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे
आवडत नाही तुला बॉक्सिंग आणि कराटे
मी मात्र झोपतो १२ च्या नंतर
रविवारी नसतं क्रिकेटशिवाय गत्यंतर
तुझं आणि माझं जमणार तरी कसं? ॥ २ ॥
फ़िरायला आवडतं , आवडतं तुला शॉपिंग
कपड्यांबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग
मला मात्र खरेदीचा येतो कंटाळा
कळत नाही रंग राखाडी आहे की काळा
तुझं आणि माझं जमणार तरी कसं? ॥ ३ ॥
घालतो मी शर्ट इस्त्री न करता
जाऊन येतो एकटाच इतरांच न ठरता
तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट
बाहेर निघताना नखरे सतराशे साठ
तुझं आणि माझं जमणार तरी कसं? ॥ ४ ॥
मला नसतात लक्षात वाढदिवसाच्या तारखा
जातो बाजाराला पण काम विसरतो सारखा
तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रिण
बारीक तुझी नजर , डोळे आहेत की दुर्बीण?
तुझं आणि माझं जमणार तरी कसं? ॥ ५ ॥
१ सांगू का तुला ?
हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण?
ऊन आणि सावली राहतात ना जसं
तुझं आणि माझं जमेल का तसं? ॥ ६ ॥
आक्रित विक्रित वैगरे
काय काय घडायला लागलय....
पोरगं येता जाता
चक्क पाया पडायला लागलय....
का तर म्हणे डॅडी सध्या मी,
सुपरमन नाही हनुमान आहे.....
मी म्हटल हो का?
छान आहे!!
बायको म्हणाली सोन्यासारख पोर माझं
करतयं संस्कृतीच रक्षण
चेष्टा सुचतिय तुम्हाला
जळ्ळ मेलं लक्षणं......
अंजनीच्या पाठिम्ब्याने पवनपुत्र हसु लागला
घरातला झिरोचा बल्ब ही त्याला
सुर्याचा गोला दिसु लागला....
रोज नवे पराक्रम.....
रोज नवे उड्डाण....
बिल्डिंग हवालदिल
सोसायटी हैराण
संध्याकाली घरी येताना
रोज चिंता लागलेली,
कोण जाने आज
कोणत्या लंकेला आग लागलेली.....
शेवटी शेपुट सरसावुन म्हणलो
'प्रिये, हे अवघड होत चाललय विलक्षण
हे केवल टि. व्हि. च खुळ आहे,
नाही संस्कृतीचं रक्षण'
म्हणाली उतरतय जरासं खुल
तो आता जरा ऍट ईझ होतोयं.....
पण मला बाई वेगळीचं चिंता लागलेली,
उद्या लॉर्ड कृष्णा रिलिज होतोय.....
==================================
गुन्हा 4/8/2006 12:37 AM
आता असं करू या
अनोळखी होऊ या पुन्हा
अन बघू या , घडतोय का
पुन्हा तोच गुन्हा
वाटेल का तुला तेच
नव्याने माझ्याबध्दल ?
की आता नक्की झाला आहे
तुझ्यामध्ये बदल ?
खरंच का आवडणार नाही
माझं तुझ्यामागे लागणं?
खरंच तू म्हणणार नाहीस
"ईश्श्य ! काय रे तुझं वागणं !"
काय हरकत आहे ,
दोन चार पावसाळे मागे जायला?
अन पुन्हा एकदा तसंच
मनसोक्त भिजायला?
हे मिळमिळीत जगणं...
करूया का चटकदार?
चल होऊन जाऊ पुन्हा
एकाच गुन्ह्याचे भागीदार !
============================
तु आणि मी 4/8/2006 12:32 AM
तुला लागतो चहा , मला लागते कॉफ़ी
तुला नाही आवडत मी उलटी घातलेली टोपी
तुला वाटते थंडी , मला होतं गरम
तू आहेस लाजाळू , मी अगदीच बेशरम
तुझं आणि माझं जमणार तरी कसं? ॥ १ ॥
झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे
आवडत नाही तुला बॉक्सिंग आणि कराटे
मी मात्र झोपतो १२ च्या नंतर
रविवारी नसतं क्रिकेटशिवाय गत्यंतर
तुझं आणि माझं जमणार तरी कसं? ॥ २ ॥
फ़िरायला आवडतं , आवडतं तुला शॉपिंग
कपड्यांबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग
मला मात्र खरेदीचा येतो कंटाळा
कळत नाही रंग राखाडी आहे की काळा
तुझं आणि माझं जमणार तरी कसं? ॥ ३ ॥
घालतो मी शर्ट इस्त्री न करता
जाऊन येतो एकटाच इतरांच न ठरता
तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट
बाहेर निघताना नखरे सतराशे साठ
तुझं आणि माझं जमणार तरी कसं? ॥ ४ ॥
मला नसतात लक्षात वाढदिवसाच्या तारखा
जातो बाजाराला पण काम विसरतो सारखा
तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रिण
बारीक तुझी नजर , डोळे आहेत की दुर्बीण?
तुझं आणि माझं जमणार तरी कसं? ॥ ५ ॥
१ सांगू का तुला ?
हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण?
ऊन आणि सावली राहतात ना जसं
तुझं आणि माझं जमेल का तसं? ॥ ६ ॥